Mon. Dec 6th, 2021

शिवसेनेच्या या 5 दिग्गजांना मंत्रिमंडळातून डच्चू

महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आज सोमवारी विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला. या मंत्रिमंडळात एकूण 36 आमदारांनी पदाची शपथ घेतली.

26 आमदारांनी कॅबिनेट तर 10 आमदारांनी राज्यमंत्रिमंडळाची शपथ घेतली. शिवसेनेच्या एकूण 12 मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

या मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. तर शिवसेनेच्या काही मंत्र्यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे दीपक केसरकर, रविंद्र वायकर, तानाजी सावंत, दिवाकर रावते आणि रामदास कदम या 5 जणांना मंत्रीपदातून वगळण्यात आले आहे. हे आमदार मागील म्हणजेच फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते.

दीपक केसरकर हे युतीसरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. तर दिवाकर रावते हे परिवहन मंत्री होते. रविंद्र वायकरांकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी होती.

पर्यावरण खातं रामदास कदमांकडे होते. तर तानाजी सावंतांकडे जलसंधारण मंत्रीपदाची जबाबदारी होती.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, उदय सामंत आणि संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान अवघ्या 1-2 दिवसांमध्ये खातेवाटप जाहीर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *