‘स्टडी टूर’ला गेलेल्या आमदारांचा तरूणीसोबत अश्लील नाच

मणिपूरमध्ये विकासकामांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासदौऱ्यासाठी गेलेल्या आमदारांचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही आमदार दारूच्या नशेत एका तरूणीसोबत जबरदस्ती नाच करताना दिसत आहे.

नेमकं ‘त्या’ व्हिडीओमध्ये काय ?

एनडीए सरकारच्या ईस्ट पॉलिसीअंतर्गत विकासकामांचा अभ्यास करण्यासाठी मणिपूरमध्ये काही आमदार गेले आहेत.
या अभ्यासदौऱ्यासाठी गेलेल्या चार आमदारांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
चारही आमदार बिहारचे असून राष्ट्रीय जनता दल, भाजपा आणि जेडीयू  या पक्षाचे असल्याचे म्हटलं जात आहे.
भारत- म्यानमार सीमेवरील मोरेह टाऊनमध्ये हा सर्व प्रकार घडल्याचे समजते आहे.
या व्हिडीओमध्ये हे आमदार एका तरुणीसोबत अश्लील नाच करत असल्याचे दिसत आहे.
एवढेच नाही तर, या व्हिडीओमध्ये तरूणीला जबरदस्ती दारू पिण्यास सांगत असल्याचेही स्पष्ट दिसत आहे.
या चारही आमदारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Exit mobile version