Wed. Jun 16th, 2021

‘येथे’ १७ एप्रिलपासून मद्यविक्रीला परवानगी

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आरोग्य आणि जीवनावश्यक सेवा वगळता इतर वस्तूंची विक्री बंद ठेवण्यात आली आहे. मात्र या ही परिस्थितीत अनेक लोकांनी दारू उपलब्ध करून देण्याची मागणी केली. लहानमोठ्या मद्यप्रेमींपासून ते ऋषी कपूर यांच्यासारख्या ज्य़ेष्ठ अभिनेत्यानेही सरकारने मद्यविक्री सुरू करावी, अशी मागणी केली होती. सध्या कोठेच मद्य मिळत नसल्यामुळे मद्यप्रेमींना लॉकडाऊनचा काळ कठीण जातोय. त्यातून लॉकडाऊन आणखी काही काळ वाढवला आहे. त्यामुळे तळीरामांना आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मात्र देशातल्या दोन राज्यांमध्ये मात्र मद्यविक्री सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसाम आणि मेघालय या दोन राज्यांच्या सरकारने १७ एप्रिल पासून मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या राज्यांत मद्यविक्रीला परवानगी असणार आहे.

लॉकडाऊन दरम्यान दारू न मिळाल्यामुळे अनेक पेताडांची दारूण अवस्था झाली आहे. दारूसाठी अनेक तळीराम सध्या तळमळत आहेत. केरळमध्ये तर काही दारुड्यांनी मारू न मिळाल्याने आत्महत्याही केल्या आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीचा विचार करत जीवनावश्यक वस्तूंबरोबरच दारूचीही विक्री पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या बाबतीत महाराष्ट्रात जरी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसला, तरी आसाम आणि मेघालय या दोन राज्यांनी मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. यासंदर्भात दोन्ही राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागातर्फे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *