मारहाणीत चोरट्याचा मृत्यू

नवी मुंबईतील सानपाडा मध्ये एक धक्कादायक घटना घडलेय. सानपाडा सेक्टर ५ मध्ये एका मोबाईल चोरट्याला नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. ललित गोयल असे या चोरट्याचे नाव असून त्याने सानपाडा विभागातून मोबाईल चोरी करत असताना नागरिकांनी त्याला पकडले.
यावेळी नागरिकांनी या चोरट्याला बेदम मारहाण केली. सानपाडा पोलिस घटनास्थळी आल्यावर त्यांनी या चोरट्याला प्रथम महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारा दरम्यान ललित गोयलचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही आणि व्हिडीओ समोर आला असून त्या व्हिडीओच्या साहाय्याने तपास करत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केलेय. मयुरेश म्हात्रे, कपिश पाटील, गौरव गवळी, निरज मुळे, जितेंद्र मालवी आणि गणेश पाटील अशी अटक आरोपींची नावे असून सानपाडा पोलिस यासर्व आरोपींची कसून चौकशी करत आहेत.