Jaimaharashtra news

चोराची अजब सवय, मॉलमध्ये चोरी केल्यावर बाहेर पडण्यापूर्वी ‘हे’ करतो!

नागपुरमध्ये सध्या एका चोराचा किस्सा चर्चेचा विषय बनला आहे. हा चोर मॉल मध्ये जातो. आत गेल्यानंतर पैशांवर हात देखील मारतो. मात्र बाहेर निघायच्या आधी एक विचित्र गोष्ट करतो. तो मॉलच्या बाथरुम मध्ये जाऊन आंघोळ करुन, नटूनथटून  नवरदेव बनून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर त्याला पाहुन कोणालाही अजिबात शंका येणार नाही, की तो एक चोरटा आहे आणि आपल्या सोबत चोरीचा माल घेऊन चालला आहे.

मात्र CCTV कॅमेऱ्यामध्ये ही सर्व दृश्य कैद झाली आहे. त्यात हा चोर नवरदेवासारखा नटूनथटून  मॉल मधून बाहेर निघताना दिसतोय.

मॉल मध्ये शिरल्या नंतर या चोरट्याने पैशांवर हात मारला. मात्र बाहेर निघण्याच्या आधी मॉलच्या बाथरुम मध्ये जाऊन अंघोळ केली आणि मधली नविन कपडे उचलले, नटूनथटून नवरदेव बनून बाहेर निघाला.

हा संपूर्ण किस्सा तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकाश मॉलमध्ये  आहे.

1 तारखेच्या मध्यरात्री नटवरलाल मॉलच्या छतावरची डॅक्टिग कट करुन मॉल च्या आत शिरला होता.

सुरुवातीला त्याने गल्ल्यातील 2 लाख 5 हजारावर हात साफ केला. त्यानंतर त्याने थाट केला.

बाहेर आल्यानंतर कोणालाही त्याच्यावर शंका आली नाही की, तो चोरीचा माल हातात घेऊन गेला.

आता पोलिस या नटवरलाल चोराच्या शोधात आहे. पोलिसांना संशय आहे की, चोर हा नागपूरच्या बाहेर असावा.

Exit mobile version