Tue. Mar 2nd, 2021

रक्कम चोरता येईना, म्हणून चोरांनी थेट ATM मशीनच पळवलं

नागपूर येथील वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत खडगाव रोड येथील ‘इंडिया नंबर-1’ चं ATM चं संपूर्ण मशीनच अज्ञात चोरट्यांनी उखडून नेलं आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खडगाव रोडवर इंदिरा नगरजवळ राजू खोब्रागडे यांच्या घरीच इंडिया नंबर 1 कंपनीचं ATM गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होतं.

मात्र 31 जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी ATM मधील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला.

त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. तेव्हा रक्कम चोरता येत नाही हे लक्षात आल्यावर संपूर्ण मशीनच चोरट्यांनी उखडून नेलं.

त्यासाठी चोरांनी CCTV system ची देखील मोडतोड केली. त्यामुळे या चोरीची जास्त माहिती मिळण्यात अडचण येत आहे.

या ATM मशीनमध्ये सुमारे 4 लाख रुपयांची रोकड होती.

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *