Sun. Oct 17th, 2021

दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवा दावा…

आम्ही अमेरिकेपेक्षाही जास्त कोविड चाचण्या केल्या…

जगभरात कोरोना कहर आता देखील कायम आहे. भारतात दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र हळूहळू दिल्ली पूर्वपदावर येत असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

‘अमेरिकेपेक्षाही जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या’ असा दवा केजरीवाल यांनी केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संवाद साधला केजरीवाल म्हणाले. दिल्लीतील जनतेने सहकार्य केले त्यामुळे आज दिल्ली पूर्वपदावर येत आहे. परिस्थिती बदलत आहे.

दिल्लीत कोरोनाची पहिली लाट जूनमध्ये आली होती. त्यानंतर दिल्लीत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला होता दिल्लीतील तिसरी लाट अति भयंकर होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आलेल्या तिसऱ्या लाटेत एकाच दिवशी १३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता,”असं केजरीवाल यांनी सांगितलं. दिल्लीत “१० लाख लोकसंख्येमागे ४५०० चाचण्या केल्या जात आहेत. देशाच्या आणि जगाच्या तुलनेत दिल्लीत दररोज सर्वाधिक चाचण्या होतात. इतकंच नाही तर चाचण्यांमध्ये अमेरिकेचाही क्रमांक आमच्यानंतर येतो,” असा दावा देखील केजरीवाल यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *