Thu. Aug 22nd, 2019

हा अर्थसंकल्प देशाला ‘पॉवरहाऊस’ बनवण्याच्या दिशेने- पंतप्रधान नरेंद्र मोदी

0Shares

आज लोकसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा देशाला पॉवरहाऊस बनवणारा असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय. हा अर्थसंकल्प सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय.

अर्थसंकल्प 21व्या शतकातील भारताची सर्व स्वप्नं पूर्ण करणारा!

अर्थसंकल्पात गरीब, शोषित, वंचित, दलित पीडित, शेतकरी, शेतमजूर, तरुण आणि महिलावर्गांच्या सशक्तीकरणासाठी विशेष पावले उचलण्यात आले असून हा अर्थसंकल्प देशाला खऱ्या अर्थाने ‘पॉवरहाऊस’ बनविणारा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

2022 मध्ये स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्त सरकारने संकल्प आखले आहेत.

या अर्थसंकल्पातून या दिशेने मार्गाक्रमण होईल.

दिशा आणि गती योग्य असल्यामुळे योग्य लक्ष्यावर पोहोचायचं आहे, असा विश्वास या अर्थसंकल्पातून मिळतोय.

21व्या शतकातील भारताचं स्वप्न हा अर्थसंकल्प पूर्ण करणारा आहे.

सर्व प्रकारच्या वंचित घटकांच्या, तरुणांच्या आणि महिलांच्या सबलीकरणाला हातभार लावणारा हा अर्थसंकल्प आहे.

या अर्थसंकल्पातून 5 लाख डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची ऊर्जा या अर्थसंकल्पातून देशाला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *