Tue. Sep 17th, 2019

‘हा’ पदार्थ चमचाभर चाखण्याचे मोजा 25 लाख!

0Shares

लोकं विविध प्रकारच्या डीश खाण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. मग तो नॉन-वेज पदार्थ असेल तर खवय्यांची गर्दीच. मात्र त्या पदार्थ्याचा फक्त एकच चमचा 25 लाखला मिळत असेल तर ? न्युयॉर्कसह नजीकच्या काही शहरातील रेस्टॉरंटमध्ये ‘व्हाईट गोल्ड अल्बिनो केव्हीयर’ नावाची डीश प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या पदार्थाचा एक चमचा चक्क 25 लाखाला मिळतो. हा पदार्थ अल्बिनो केव्हीयर माशाच्या गाभोळीपासून तयार करण्यात येते.

नेमकी ‘ही’ डीश आहे तरी काय ?

व्हाईट गोल्ड अल्बिनो केव्हीयर असे या डीशचे नाव आहे.

हा पदार्थ अल्बिनो केव्हीयर माशाच्या गाभोळीपासून तयार करण्यात येतो.

विशेष म्हणजे या पदार्थात चक्क 22 कॅरेट सोने वापरण्यात येत आहे.

या पदार्थाचा एक चमचा चव घेण्यासाठी श्रीमंत वर्ग 25 लाख रुपये मोजतात.

या पदार्थाचा शोध ऑस्ट्रीयातील मत्सशेती करणारे वाल्टर ग्रूएलर व त्यांचा मुलाने लावला आहे.

हा पदार्थ ब्रेड बटरसोबतही खाल्ला जातो.

विशेष म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी ऑस्ट्रीयातील केव्हीयर मासाच हवा असल्याचे वाल्टर यांनी म्हटलं आहे.

पाण्याचे प्रदूषण नसल्यामुळे ही डीश चविष्ठ आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *