Thu. Sep 29th, 2022

 ‘ही तर फिक्स मॅच’

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून रोखठोक भूमिका मांडली असून शिंदे गटावर जोरदार आसूड ओढला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी फिक्स मॅच पाहत नाही. मी लाईव्ह मॅच पाहत असतो. खरी मॅच पाहत असतो. पण जी फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची?  अशी खोचक प्रतिक्रिया केली आहे.

उद्धव ठाकरे यांची महामुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मुलाखतीमुळे शिंदे गट आणि भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी फिक्स मॅच कधी पाहत नाही. मी पाहतो तर लाईव्ह मॅच पाहत असतो. जो सामना खरा आहे, तो पाहत असतो. पण जी फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? काही दिवासांनी काही गोष्टी स्पष्ट होतील, त्यानंतर पाहू, असं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. याविरोधात काँग्रेसची आंदोलनं ही निरर्थक आहे. मुळात आम्हीही काही तरी केलंय. आम्हीही तुमच्या पाठी आहोत. भविष्यात आम्हालाही काही तरी द्या. एवढंच सांगण्यासाठी ते आंदोलन आहे. बाकी त्यात काही नाही. त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.