Sat. Oct 1st, 2022

#CAA जेव्हा ‘ते’ तिरंगाधारी बनले पोलिसांची ढाल…

CAA विरोधात उसळलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण मिळालं. अहमदाबादमध्ये आंदोलनादरम्यान पोलसांवर दगडफेकीच्या दुर्दैवी घटनाही घडल्या. Citizenship Amendment Act च्या विरोधकांमधील काही आंदोलनकर्त्यांनी अचानक पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. मात्र शाह-ए-आलम येथे एक अशी घटना घडली, ज्यामुळे पोलीस या दगडफेकीपासून वाचले.

ते बनले पोलिसांची ढाल

अहमदाबादच्या शाह-ए-आलम परिसरात गुरुवारी CAA विरोधात होत असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पोलिसांना घेरलं आणि त्यांच्यावर दगडफेक करण्यस सुरुवात केली.

आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यामध्ये पोलीस SP सह 19 पोलीस जखमी झाले.

मात्र याच हिंसक आंदोलनात अचानक पोलिसांना वाचवण्यासाठी काही तरूण पुढे आले.

या तरुणांच्या हातात तिरंगा होता. हे तरुण पोलिसांची ढाल बनून पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये उभे राहिले.

एका पोलीस कर्मचाऱ्याला एकटं गाठून आंदोलकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली होती. मात्र तिरंगा हाती घेतलेल्या तरुणांनी या आक्रमक आंदोलकांपासून जखमी पोलिसाची सुटका केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.