Sun. May 16th, 2021

हा आहे नितीन गडकरींचा पुढील ‘Plan of Action’

लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर नितीन गडकरी यांना दळणवळण खातं देण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर गडकरी आपला मतदारसंघ असलेल्या नागपूर येथे आले. यावेळी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिलं.

 

काय आहे गडकरींचं पुढील कामाचं नियोजन?

राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करणं.

देशाचा जीडीपी वाढवणं

रोजगार निर्मिती करणं

लघू उद्योगांची निर्मिती करणं

आपण अजून कोणतंही लक्ष्य ठरवलेलं नाही, असं नितीन गडकरी म्हणाले. मात्र त्यांच्या मनातील योजनांची कल्पना त्यांनी दिली.

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार असल्याचं गडकरी म्हणाले.

अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.

रस्त्यांच्या बाजूने 125 कोटी झाडांची लागवड करण्याचं आमचं टार्गेट असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं.

3 वर्षांत सर्व महामार्गांची कामं होतील पूर्ण!

मी माझ्याकडील काम जास्तीत जास्त करणार आहे. मात्र मी सर्वात कार्यक्षम मंत्री आहे की नाही हे जनताच ठरवेल, असं गडकरींनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

पुढील 3 वर्षांत सर्व महामार्गांची कामं पूर्ण होतील. तसंच 2020 च्या मार्चपर्यंत गंगा शुद्धीकरणाचं कामही पूर्ण होईल.

ग्रामोद्योग आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यात येईल, तसंच खादी आणि मधाची निर्यात वाढवणं हे आपलं सध्याचं टार्गेट असल्याचं गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *