Thu. Aug 22nd, 2019

तीन वर्षापासून पुरुषांची मुतारी साफ करते ही महिला

0Shares

महिला कर्मचाऱ्यास पुरुषांची मुतारी साफ करण्याचे काम लावल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघड झाला आहे. ही महिला गेल्या तीन वर्षापासून ती कोल्हापुरमधील विविध परिसरातील चार मुताऱ्या ही महिला साफ करते. महापालिका प्रशासनाकडून त्यांना हे गलिच्छ काम देण्यात आलं आहे. रुग्णालयातील बदली नंतर द्यायला कोणते काम नसल्याने त्यांना हे काम देण्यात आलं आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासनावरती अनेकांच्या संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

संतोषी छत्रीबंद या कोल्हापुरमध्ये महापालिकेत रुग्णालयात कर्मचारी म्हणून काम करतात.

त्यांना पुरुषांची मुतारी साफ करण्याचे काम लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रुग्णालयातील बदली नंतर द्यायला कोणते काम नसल्याने त्यांना हे काम देण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकाच्या पत्नी असूनही प्रामाणिकपणे हे काम करत आहेत.

मुतारी साफ करताना पुरुषांच्या वाईट नजरा, अश्लील शेरेबाजीचा सामना त्यांना करावा लागत आहे.

माणुसकीचे भान नसलेल्या महापालिका प्रशासनाला मात्र त्याचे सोयरसुतक नसल्याचे म्हटलं आहे.

महापालिकेच्या या प्रकाराच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *