Sat. Jun 12th, 2021

या हॉटेलमध्ये बिल न भरता जेवता येतं पोटभर

साधारण हॉटेलपासून (Restaurant) ते फाईव्ह स्टार हॉटेल्स (Five Star Hotel) आपण पाहिली असतील, मात्र मोफत किंवा इच्छेने पैसे घेणारे हॉटेल आपण पाहिले नसेल. असं एक आगळं वेगळं हॉटेल बुलडाण्यामध्ये आहे. या हॉटेलची वैशिष्ट्यं पाहून तुम्ही देखील

काय आहे या हॉटेलचं वैशिष्ट्य?

हॉटेल म्हटलं की वेगवेगळे चवदार आणि चमचमीत पदार्थाची मेजवानी. पदार्थांनुसार त्यांचे दरही ठरलेले असतात. मात्र,बुलढाण्यात असं एक आगळंवेगळं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये जितकं खायचं तितकं खा. बिल द्यायची इच्छा असेल तर दया, नाही दिले तरी चालेल.. हो, अगदी सगळं खाऊन एक पैसाही दिला नाही, तरी चालतं या हॉटेलमध्ये… या हॉटेलचं नाव आहे ‘सेवा किचन’ (Seva Kitchen)

या हॉटेलमध्ये तुम्हाला ‘रेट बोर्ड’ दिसणार नाही. इथं लिहिलेले आहेत फक्त सुविचार आणि जेवणाचा मेनू. (Menu)

ग्राहकांना पोटभर जेवण (Food) झाल्यानंतर त्यांच्यापुढे जे बिल येतं ते अचंबित करणारं असतं. कारण आपल्या जेवणाचं बिल दुसऱ्यानेच दिलं असतं.

अशी साखळी जर तुम्हालाही सुरू ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देणगी देऊ शकता…

चिखली रोड वर असणाऱ्या आणि दर रविवारी चालणाऱ्या या हॉटेलची सुरुवात 3 महिन्यांपूर्वी झाली.

या हॉटेलात काम करणारी मुले हे सर्व बुलडण्याच्या राजर्षी शाहू औषध निर्माण महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला शिकणारे विद्यार्थी (Students) तसंच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं आहेत.

ते या हॉटेलला लागणारा खर्च काढून उरलेल्या पैशातून आपल्या शिक्षणाला लागणारा खर्च भागवतात.

सर्वात महत्वाचं म्हणजे या हॉटेलमध्ये (hotel) काम करणारे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या समाजाचे असून सर्वांचे आडनाव ‘भारतीय’ ठेवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *