Thu. May 19th, 2022

राज्यातील ‘ही’ शाळा मोडकळीस, प्रशासनाचे दुर्लक्ष

राज्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना दुरूस्तीची गरज आहे. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे अशा शाळांमध्ये अनेक घटना घडल्या आहेत.

दरम्यान चंद्रपुरमधील अशाच एका शाळेचे वास्तव उघडकीस झाले आहे.

कोरपना पंचायत समिती अंतर्गत एकोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेची इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

तसेच ही इमारत धोकादायक झाली आहे. यामुळे या शाळेतील विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन शाळेत शिकत आहेत.

शाळेच्या इमारतीची दुरुस्तीसाठी शालेय व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिला आहे.

मात्र या प्रस्तावाकडे पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

तसेच इमारतीच्या दुरुस्तीसाठीचं निवेदन चंद्रपूर माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना दिलं आहे. मात्र त्यांच्याकडूनही या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे, ग्रामस्थांचा असा आरोपही आहे.

चंद्रपुरातील एकोडीमधील ही शाळा आहे.

या शाळेत फक्त दोन वर्गापर्यंत शिक्षण दिलं जातं. या शाळेत 28 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत २ शिक्षक आहेत.

शाळेसाठी २० वर्षांपूर्वी २ खोल्या बांधण्यात आल्या होत्या. या २ खोल्यांची अवस्था आता दयनीय झाली आहे.

तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी बांधण्यात आलेले स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. .

शाळेतील दोन्ही खोल्यांचं स्लँब खराब झाले आहे. तसेच भिंतींनाही भेगा पडल्या आहेत.

शाळेच्या छतामधुन गिट्टी, रेती, विद्यार्थ्यांनच्या डोक्यावर आणि पुस्तकांवर पडत आहे. त्यामुळे शाळेची इमारत कधी कोसळेल, सांगता येत नाही. यामुळे आता या शाळेची दुरूस्ती कधी होणार या प्रतिक्षेत तेथील ग्रामस्थ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.