Wed. Feb 19th, 2020

‘साहो’नंतर ‘हा’ आहे प्रभासचा आगामी सिनेमा!

बाहुबलीच्या दैदीप्यमान यशानंतर तेलुगू अभिनेता प्रभास याचा साहो हा सिनेमा प्रदर्शित झालाय. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. अनेकांनी सिनेमा तितकासा चांगला नसल्याचं जरी म्हटलं असलं, तरी प्रभासच्या फॅन्सनी मात्र हा सिनेमा डोक्यावर घेतलाय. खुद्द प्रभास मात्र त्याबाबत फारसा विचार न करता आपल्या पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे.

मध्ययुगीन कालखंडातला ‘बाहुबली’ आणि मॉडर्न स्टाईलचा ‘साहो’ केल्यावर प्रभासच्या आगामी सिनेमाची कथा 1970 सालच्या पार्श्वभूमीवर असणार असल्याचं सांगण्यात येतंय.

राधाकृष्ण हा सिनेमाचा दिग्दर्शक आहे. तर पूजा हेगडे या सिनेमात प्रभासची हिरोइन असेल.

हा सिनेमा रोमँटिक असेल. तसंच वेगवेगळ्या काळातील प्रेमकहाण्या यात असतील, असं दिग्दर्शकाने Tweet करून सांगितलंय.

हा प्रभासचा वीसावा सिनेमा असेल. त्यामुळे सध्या जरी या सिनेमाचं नाव ठरलं नसलं, तरी या सिनेमाला #Prabhas20 असं म्हटलं जातंय. या सिनेमाचं नाव ‘जान’ असेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

या सिनेमासाठी प्रभासने तयारी करायला सुरुवात केली आहे. ‘बाहुबली’ आणि ‘साहो’नंतर या सिनेमात प्रभास आणखी वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्यासाठी प्रभासने आपलं वजन बरंच कमी करण्यावर भर दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *