यंदा उत्सव निर्बंधमुक्त

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ब्रेक लागलेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सवला यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाला कोणतेही निर्बंध असणार नाही. याशिवाय कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला गणेशोत्सवही धुमधडाक्यात साजरा होणार आहे. याच कारणास्तव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली आहे. या बैठकीकडे गोविंदा प्रेमी आणि गणेश भक्तांचे लक्ष लागून राहिले होते. या बैठकीत कायदा व सुव्यवस्थेसह नियमावली बाबत सरकार ने अनके निर्णय घेतले आहेत. या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकींनंतर पत्रकार परिषद घेत बैठकीत झालेल्या मुद्द्यांनबदल चर्चा करत अनेक घोषणा करण्यात आल्या. यंदाचे उत्सव निर्बंधमुक्त होणार याची घोषणा केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी निमित्त कायदा आणि सुव्यवस्था आणि इतर समस्यांसंदर्भात बैठकीत अनके मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे कोरोनाचे निर्बंध असल्याने राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्यात आला होता.मात्र या वर्षी गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वत्र उत्सवाचे वातारण निर्माण होणार आहे, आणि सर्वत्र उत्साह पहिला मिळणार आहे.राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहे. प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनाही सूचना देण्यात आले आहे. तर गणेश मूर्तीवरचे निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत.याच बैठकीत गणेशमूर्ती कारासाठी देखील आनंदाची बातमी देण्यात आली आहे, मूर्ती च्या उंची वरील देखील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक या वर्षी मोठ्या उत्सवात सण साजरे करतील.