नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी केला खुलासा

नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी ई-मेलच्या माध्यमातून पीटीआयला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी देशात जे सुरू आहे यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या मुलाखतीत म्हटलं, सरकारला जे लोक आवडत नाहीत त्यांना दहशतवादी घोषीत केलं जाऊ शकतं तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाईही होऊ शकते, असं मत नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं आहे.
सेन यावेळी सांगितले, “शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने वापर करणारे कन्हैया, खालिद आणि शेहला सारख्या युवा दूरदृष्टी ठेवणाऱ्या नेत्यांसोबत राजकीय संपत्तीसारखा व्यवहार करण्य़ाऐवजी दडपशाहीप्रमाणे वागणूक दिली जात असून त्यांना शांततापूर्ण प्रकारे पुढे जाण्याची संधी दिली गेली पाहिजे.
सेन यांनी केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थन केले. नुकतेच, विश्वभारती विद्यापीठाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला अतिक्रमण करणाऱ्यांची एक यादी पाठवली आहे. या यादीत प्राध्यापक अमर्त्य सेन यांच्या नावाचाही समावेश आहे.
विद्यापीठाचं म्हणणं आहे की, विश्व भारतीच्यावतीने सेन यांच्या दिवंगत वडिलांना कायदेशीररित्या भाड्यानं दिली होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील अमर्त्य सेन यांना पाठिंबा देत त्यांच्यावर लावलेल्या आरोपांना बिनबुडाचं म्हटलं आहे. सध्याला अमर्त्य सेन हे सध्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत.