Thu. Jan 27th, 2022

देशाला केरळमधून तिसऱ्या लाटेचा धोका ?

लसीकरण सर्वत्र वेगानं सुरु असतानाही कोरोना संक्रमित रुग्णांचे आकडे वाढताना दिसत आहे. ब्रिटन, अमेरिका आणि रशियासह काही मोठ्या देशात कोरोनाचे आकडे वाढत आहेत .तर भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच दुसरीकडे केरळमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक झाली आहे. देशात शुक्रवार पासून कोरोनाचे ४४ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले तर ५५५ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला. त्यातील निम्मे रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. आता ईशान्येकडील पाच राज्यांतही कोरोना संसर्ग वाढत आहे. भारतात तिसरी लाट अद्याप आलेली नाही, मात्र ती केरळमधून येईल, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शुक्रवार पासून सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये सुमारे पन्नास टक्के रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. केरळमध्ये परिस्थिती नियंत्रणा बाहेर जात आहे .सलग चौथ्या दिवशी २० हजारांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत.

सर्वाधिक रुग्ण आढळणारे पाच राज्य

केरळ – २२ हजार ६४ रुग्ण
महाराष्ट्र – ७ हजार २४२ रुग्ण
आंध्र प्रदेश – २ हजार १०७ रुग्ण
कर्नाटक – २ हजार ५२ रुग्ण
तामिळनाडू – १ हजार ८५९ रुग्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *