Wed. May 22nd, 2019

बंगालमध्ये लोकशाही धोक्यात- अमित शाह

0Shares

कोलकात्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रोड शो केला. या रोड शोदरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्येही राडा झाला. या संघर्षात दगडफेक तसंच जाळपोळही करण्यात आली. या हिंसेत 100 हून अधिक BJP कार्यकर्ते जखमी झाल्याटं सांगण्यात येतंय. या हिंसाचारामागे तृणमूल काँग्रेची विद्यार्थी संघटना असल्याचा आरोप भाजपने केलाय. दिल्ली येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं.

 

काय म्हणाले अमित शाह पत्रकार परिषदेत?

संपूर्ण लोकसभा निवडणुकीत केवळ पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाल्याचं दिसून येतंय.

पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान आत्तापर्यंत तीन वेळा हल्ले घडवून आणण्यात आले आहेत.

ही हिंसा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच घडवून आणली आहे.

पोलिसांना माहिती असूनही त्यांनी कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली.

केवळ CRPF च्या जवानांमुळे आपण या हिंसाचारातून बचावलो.

पश्चिम बंगालमध्ये लोकशाही धोक्यात असल्याचं या घटनेमधून दिसून येतंय, असं अमित शाह यांनी म्हटलंय.

‘भाजपनेच हे घडवून आणलं असतं तर…’

हा हिंसाचार भाजपनंच घडवून आणला असावा अशा आरोपावरही शाह यांनी उत्तर दिलंय.

भाजपनेच जर ही हिंसा केली असती, तर प्रत्येक राज्यात हिंसाचार दिसला असता.

मात्र असा हिंसाचार केवळ पश्चिम बंगालमध्ये घडलाय.

कारण टीएमसी केवळ ४२ जागांवर निवडणूक लढत आहे. भाजप मात्र संपूर्ण देशभर निवडणूक लढत आहे.

रोड शोच्या तीन तासांपूर्वीच आमची पोस्टर्स, बॅनर्स काढून टाकण्यात आली होती.

मोदींचीही पोस्टर्सही फाडण्यात आली होती.

या प्रकरणात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या लोकसभा निवडणुकीत तृणमूलचा पराभव निश्चित असल्याचं अमित शाह यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय. तसंच पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराविरोधात भाजप आज दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *