Mon. Dec 6th, 2021

भरदिवसा वकीलावर तलवारीने हल्ला ; पोलिसांनी केली तिघांना अटक

मुंबई : बोरिवली भागात सत्यदेव जोशी नावाच्या वकीलावर गुंडांच्या टोळक्याने भरदिवसा हल्ला केला. जोशी यांच्यावर गुंडांनी लाठी-तलवारींनी हल्ला करत वार केले. हल्ल्यामुळे जोशी यांना दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीनं झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
मोबाइल कॅमेऱ्यात टिपल्या गेलेल्या दृश्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. बोरीवलीच्या एम एच बी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलै रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला हे समजू शकलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *