Thu. May 13th, 2021

भोसरीत तीन मुलांसह जन्मदात्या आईची आत्महत्या

पिंपरी- चिंचवड येथील भोसरी येथे जन्मदात्या आईनेच तीन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फळ व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील रहिवासी असून फळ विकण्याचा धंदा करत कुटुंब पोट भरत होते. मात्र सतत व्यवसायात नुकसान होत असल्याने पत्नी-पतीमध्ये मोठा वाद झाला होता.

नेमकं काय घडलं ?

भोसरीत जन्मदात्या आईनेच पोटच्या तीन मुलांसह गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

बागवान कुटुंब मुळचे कर्नाटकचे असून त्यांचा पुण्यात फळ विकण्याचा व्यवसाय आहे.

मात्र वारजे, तळेगाव येथे मोठे नुकसान झाल्यानंतर भोसरीत नव्याने व्यवसाय करण्यास आले होते.

सततच्या नुकसानामुळे आणि कुटुंब स्थिर नसल्यामुळे पती-पत्नीमध्ये मोठा वाद निर्माण झाला.

वाद झाल्यामुळे पती 10:30 च्या सुमारास घर सोडून निघून गेला.

मात्र घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा वाजवल्यानंतरही उघड नसल्यामुळे दरवाजा तोडून घरात शिरला.

तिन्ही मुलं आणि पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजले.

सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट बघत असून त्यात स्पष्ट होणार असल्याचे म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *