Sun. Sep 22nd, 2019

व्यायाम करत असताना घडला ‘असा’ अपघात, तिघांचा मृ’त्यू!

0Shares

महामार्गाच्या कडेला व्यायाम करत असताना एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तीन शालेय विद्यार्थी ठार झाल्याची घटना बीड येथे घडली आहे. ही घटना शनिवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील गढी जवळ घडली. हे तीनही शालेय विद्यार्थी गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील आहेत.

14 वर्षीय सुनिल प्रकाश थोटे आणि अभिषेक भगवान जाधव आणि 16 वर्षीय तुकाराम विठ्ठल यमगर अशी अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

हे तिघेही गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील राहिवासी होते.

ते शनिवारी पहाटे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण -विशाखापट्टणम या महामार्गावर व्यायाम करण्यासाठी गेले होते.

याच दरम्यान गढीकडून माजलगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या तिघांनाही पाठीमागून जोराची धडक दिली.

यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांसह ट्राफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेने तळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *