Mon. Dec 9th, 2019

भारतीय जवानांकडून लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

वृत्तसंस्था, जम्मू- काश्मीर

 

जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीत लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं.

 

मात्र, या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे 3 एके 47 सापडल्या आहेत. जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमक आता संपली असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

 

दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर काश्मीर खो-यात कोणत्याही प्रकारे हिंसाचार उफाळून येऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून बारामुल्ला परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *