Wed. Dec 1st, 2021

मुंबईतील ‘या’ तीन वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार

भारत, ऑस्ट्रोलिया, चीन, भूतान आणि न्यूझीलंडमधील 16 वास्तूंना युनेस्कोकडून पुरस्कार देण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा स्ठळांचं जतन व संवर्धनासाठी  युनेस्कोकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारासाठी 57 वास्तूंची नोंदणी  14 देशांमधून  करण्यात आली होती. त्यामधून या 16 वास्तूंची निवड करण्यात आले आहेत.

‘या’ वास्तूंचा समावेश

मुंबईमधील फ्लोरा फाऊंटन, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च, नेसेट एलियाहू सिनागॉन.

अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट

अशा भारतातील चार हेरिटेज वास्तूंना युनेस्कोचा यंदाचा एशिया-पॅसिफिक पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

ब्रिटिशकाळात १८६४मध्ये स्थापत्य आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले मुंबईतील फ्लोरा फाउंटन.
१८८४ सालचे फोर्टमधील यहुदींचे प्रार्थनास्थळ नेसेट एलियाहू सिनेगॉग
 भायखळा-माझगाव येथील रोमन कॅथलिक चर्चपैकी एक आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *