Thu. Aug 5th, 2021

वाघाच्या हल्ल्यात 3 जण जखमी

भरदिवसा झालेल्या वाघाच्या हल्ल्यात 3 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. विदर्भातील भंडारा राज्यमार्गावरुन बाईकवरुन जाणाऱ्या दोघांवर पट्टेदार वाघाने झडप घातली. यामध्ये बाईकवरील दोघे जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली.

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरुन जात असलेल्या बाईकवर झुडूपात लपून बसलेल्या वाघाने हल्ला चढवला. या हल्ल्यात बाईकवरील दोघे जखमी झाले. छोटेलाल ठाकरे आणि शंकरलाल तुरकर अशी वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नाव आहेत.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनेस्थळी धाव घेतली.

यावेळी त्या वाघाने आणखी एकावर हल्ला केला. या हल्ल्यात वाघाने त्या व्यक्तीच्या पोटावर जबर चावा घेतला. वाघाने पोटावर चावा घेतलेल्या व्यक्तीचे  नाव विजय शहारे असे आहे.

ही घटना तुमसर तालुक्यातील बिनाखी शिवारात घडली.  

तुमसर तालुक्यातील सिहोऱ्यात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर आहे. गावकऱ्यांना 3 दिवसांपूर्वी वाघाचे दर्शन झाले होते. यामुळे गावकरीही दहशतीखाली होते.

दरम्यान उपस्थित इतर लोकांनी वाघाला हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. वाघाच्या हल्लयात जखमी झालेल्यांवर सीहोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान  वाघाने हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *