Jaimaharashtra news

नागपुरातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित

नागपूर : नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर नामक दिव्यांग तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील तीन कर्मचाऱ्यांना नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, पोलीस शिपाई नामदेव चरडे आणि आकाश शहाने यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्यांग मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू असून सर्व निलंबित कर्मचाऱ्यांची बदली पोलीस मुख्यालय करण्यात आली होती. सात जुलैच्या रात्री नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घडली होती. नाकेबंदी दरम्यान मनोजची दुचाकी पोलिसांच्या वाहनावर धडकली होती, ज्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. यात दिव्यांग मनोजचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version