Thu. Sep 16th, 2021

भारतातील तीन व्याघ्रप्रकल्प वाघांविना

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २९ जुलैला साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या वतीने दर चार वर्षांनी व्याघ्रगणना करण्यात येते. वाघांचे अस्तित्व, त्यासाठी पुरेसे खाद्य, अधिवास, संचारमार्ग या प्राथमिक, पण आवश्यक बाबींची पूर्तता होत असेल तर त्या ठिकाणाला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात येते.

व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनात प्रशासन अपयशी तर ठरले नाही ना, असा प्रश्न भारतातील काही व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या आकडेवारीवरून उपस्थित होत आहे. भारतातील तीन व्याघ्रप्रकल्प वाघांविना आहेत. पाच व्याघ्र प्रकल्पात केवळ एक वाघ आहे तर १७ व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या एक आहे.

शून्य वाघांची संख्या असणारे प्रकल्प

  •         झारखंड – पालामू
  •         मिझोराम – डम्पा
  •         पश्चिम बंगाल – बक्सा
  •         एकच वाघ असणारे व्याघ्र प्रकल्प
  •         छत्तीसगड – उदनती सीतानदी
  •         ओडिशा – सातकोसीआ
  •         राजस्थान – रामगड
  •         राजस्थान – मुकूंद्रा हिल्स
  •         तेलंगणा – कावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *