वाघाच्या हल्ल्यात एक ठार

वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. वाघाने केलेल्या हल्ल्यात पुरुष ठार झाला आहे.
उद्धव टेकाम (५८) ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चुनाळा येथे ही घटना घडली आहे. उद्धव मारोती टेकाम वय 58 वर्ष हे जंगलात लाकडं आणण्यासाठी गेले होते.
मृतक उद्धव टेकाम महसूल विभागाच्या जंगल परिसरात लाकडं आणण्याकरिता गेले होते. यावेळेच वाघाने त्यांच्यावर हल्ला करत टेकाम यांना जागीच ठार केलं.
वाघाने टेकाम यांना छाती पर्यंत खाऊन टाकले.
वन विभागाने नरभक्षक वाघाला जेरबंद न केल्याबद्दल जनतेत प्रचंड रोष पसरला आहे. घटना स्थळावर वन विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी पोहोचून परिस्थिती हाताळत आहे.