Jaimaharashtra news

फुटबॉल सामन्यात टायगर श्रॉफ जखमी, मैदानात मदतीला धावली दिशा पाटणी

रविवारी मुंबई येथे चॅरिटी फुटबॉल सामन्या दरम्यान अभिनेता टायगर श्रॉफ जखमी झाला. त्याच्यावर वैद्यकिय उपचार सुरू असताना त्याच्या मदतीला दिशा पाटणी धावून आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफला चॅरिटीसाठी फिल्म इंडस्ट्रीच्या सहकाऱ्यांसोबत फुटबॉल खेळत असताना दुखापत झाली. दुखापत झाल्याचं कथित गर्लफ्रेंड दिशा पाटणी तात्काळ त्याची काळजी घेण्यासाठी पोहोचली असून यादरम्यान हा खेळ चॅरिटीसाठी रविवारी आयोजित केला होता आणि या सेलिब्रिटी फुटबॉल सामन्यासाठी टायगर श्रॉफ खेळत होता. या सामन्याचा आनंद दिशा पाटणीही लुटत होती. टायगरला झालेली दुखापत किरकोळ होती. काही वेळानंतर तो मैदानाच्या बाहेर दिशासोबत चालत निघून गेला. फुटबॉल सामन्यात टायगर श्रॉफ जखमी कामाच्या पातळीवर टायगर श्रॉफ हा कृती सेनॉनची मुख्य भूमिका असलेल्या गणपत या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. तसेच हिरोपंथी या चित्रपटाच्या सीक्वेलमध्येही काम करीत आहे

Exit mobile version