Sat. Jul 31st, 2021

Tik Tok साठी नागाला Kiss! आरोपी गजाआड!

सापांशी जीवघेणे स्टंट करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत थाट गाजवणं दोन तरुणांना चांगलेच महागात पडलं. या व्हिडिओमधील एका अल्पवयीन मुलासह तरुणाला कल्याण वन भागाने गजाआड केलंय. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघे सापाला पकडून त्यांचा चुंबन घेण्याचं, तसंच लहान मुलांकरवी सापाचे चुंबन घेण्याचे फोटो, साप गळ्यात बांधून जीवघेणे स्टंट सोशल मिडियावर अपलोड करत होते. कुणाल लांडगे असं अटक तरुणाचं नाव असून मुख्य आरोपी अल्पवयीन आहे.

सापाचं चुंबन, तुरुंगात रवानगी!

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दोन तरुणांचे विविध सापांसोबतचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते.

या व्हिडिओंमध्ये हे तरुण सापांचं चुंबन घेणं,

लहान मुलांकरवी सापाचं चुंबन घेणं,

चेहऱ्यापासून काही अंतरावर सापाला ठेवून सेल्फी काढणं,

साप गळ्यात घालून फिरणं,

जीवघेण्या पद्धतीने साप हाताळणं आशा नाना प्रकारे सापांशी जीवघेणे स्टंट करत होते.

याबाबत महाराष्ट्र सह गुजरात मधून अनेक प्राणी मित्रांनी वन विभागाला तक्रारी केल्या होत्या.

या तक्रारीनुसार वन विभागाने या व्हीडियोच्या आधारे सापांच्या जीवाशी खेळणाऱ्या व जीवघेणा खेळ करणाऱ्या या दोघा तरुणांचा शोध सुरू केला.

अखेर 22 मे रोजी सकाळी या दोन्ही तरुणांना डोंबिवली येथून अटक करत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. यातील मुख्य आरोपी अल्पवयीन असून कुणाल लांडगे असं त्याच्या साथीदारचे नाव आहे.याबाबत वन विभागाच्या अधिकरी कल्पना वाघेरे यांनी अशाप्रकारे सापांशी खेळू नये तसंच अशा प्रकारचे लोक वावरत असतील तर वनवीभागाला सहकार्य करावे, काही आक्षेपार्ह आढळल्यास वन विभागाचं 1926 वर संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *