Wed. Jun 26th, 2019

तरुणांचं फेव्हरेट ‘Tik Tok’ आता ‘ban’ !

42Shares

Tik Tok ची क्रेझ सध्याच्या तरूणाईमध्ये पाहता त्यातून निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या तसेच या अॅपचे गैरवापर होत असल्याची प्रकरणं समोर आली होती, याचे गांभीर्य लक्षात आल्याने सुप्रीम कोर्टाने गुगल आणि अॅपल यांना त्यांच्या प्ले स्टोअरवरून टीक टॉक अॅप डीलीट करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून आता यापुढे प्ले स्टोअरवरून आता Tik Tok अॅप डाऊनलोड करता येणार नाही.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर Tik Tok वर बंदी

Tik Tok हे एक Video बनवणारं अॅप आहे.

तरूणाईमध्ये या अॅप ची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे.

व्हिडीओ बनवण्याच्या नादामध्ये तरूणाईला भान न राहिल्याने अनेक अपघातांना सामोरे जावे लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.

तसेच या माध्यमाचा गैरवापर होऊन अश्लील videos करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस आल्या होत्या.

या सगळ्यांचा विचार करता सुप्रीम कोर्टाने Apple आणि Google  प्ले स्टोअर वरून Tik Tok  अॅप काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

Xiomi आणि Vivo यांचा वापर करणाऱ्यांना TikTok वापरता येणार आहे. तसंच यापूर्वी ज्यांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे, ते या अॅपचा वापर करू शकतात.

‘म्युझिकली’ या पूर्वीच्या नावामध्ये बदल करत आता ‘Tik Tok’ या नव्या अॅपला अपडेट करत युजर्ससाठी वापरण्यात आला होता.

Tik Tok च्या नादात मित्राचा गोळी लागून मृत्यू

यामध्ये नवनवीन Effects ची क्रेझ कॉलेज युथ मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.

व्हिडीओ बनवण्याच्या नादामध्ये अपघात होणं किंवा अनेक जणांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

अशीच दिल्लीमध्ये एक घटना घडल्याची समोर आली होती.

यामध्ये तीन जणांचा व्हिडिओ बनवताना एका मित्राकडून दुसऱ्या मित्राला खऱ्या बंदुकीची गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.

42Shares

Leave a Reply

%d bloggers like this: