Tik Tok ने मोडला Whatsapp, Facebook, Instagram चा ‘हा’ विक्रम!

मोबाईलवर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्य़ा apps मध्ये Whatsapp, Facebook, Instagram, Tik Tok यांचा क्रमांक वरचा आहे. मात्र Tik Tok ने इतर Apps ला मागे टाकत नवा विक्रम रचला आहे. Tik Tok हे फेब्रुवारी 2020 मध्ये Google Play आणि Apple App Store वरून सर्वाधिक Download झालेलं App ठरलं आहे.

Tik Tok ची लोकप्रियता Whatsapp, Facebook, Instagram या सर्वांपेक्षा जास्त वाढली आहे. Sensor Tower Report ने दिलेल्या अहवालानुसार TikTok ने Revenue आणि Installing म्हणजेच उत्पन्न आणि वापर यांमध्ये इतर apps ना मागे टाकलं आहे. Google Play Store वर एकाच महिन्यात 9 कोटी 32 लाख वेळा Tik Tok install केलं गेलं. भारतात Tik Tok  download करणाऱ्यांची संख्या 4 कोटी 66 लाख होती.

चीनच्या Tik Tok ची यामुळे 5 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त कमाई झाली आहे. चीनच्या खालोखाल भारतात हे app सर्वाधिक download केलं गेलं. त्या खालोखाल ब्राझील, अमेरिका, इंग्लंडमध्ये हे App सर्वाधिक download केलं गेलंय. गंमत म्हणजे तरीही Tik Tok मधून सर्वाधित कमाई करून देणाऱ्या देशांत भारताचा समावेश नाही.

Exit mobile version