Tue. Aug 20th, 2019

‘Tik Tok’ ला नवा पर्याय!

0Shares

Tik Tok अ‍ॅपच्या बंदी नंतर आता भारतामध्ये नवं व्हिडीओ मेकिंग App लाँच होणार आहे. भारतामध्ये या अ‍ॅपचे जास्तीत जास्त युजर्स आहेत. व्हिडिओ मेकिंग करणाऱ्या टिक-टॉक या अ‍ॅपला बाईट डान्स या कंपनीकडून लाँच करण्यात आले होते. याच कंपनीने 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून यापूर्वी भारतामध्ये अ‍ॅप लाँच केले होते. आत्तापर्यंत विगो, हेलो आणि टीक-टॉक ही तीन अ‍ॅप्स भारतामध्ये लाँच करण्यात आली होती.

Tik Tok ला भारतामध्ये नवा पर्याय

टीक-टॉक वर काही आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याने मद्रास हायकोर्टाकडून हे अ‍ॅपला भारतामध्ये बंद करण्यात आलं होतं.

आता टीक-टॉकला लाँच करणाऱ्या बाईट डान्स या कंपनीने नवं व्हिडीओ मेकिंग अ‍ॅपला लाँच करण्याचे जाहीर केलंय.

यासाठी भारतामध्ये चीनच्या कंपनीने 1 अब्ज डॉलर गुंतवणूक केली आहे.

यावेळी बाईट डान्सचे आंतरराष्ट्रीय पब्लिक पॉलिसी डायरेक्टर म्हणाले की, या अ‍ॅपवर बंदी आणल्यामुळे आम्हाला दु:ख होत आहे.

पण यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही नवीन पर्याय शोधत आहोत, कारण एकट्या भारतामध्येच टिक-टॉकचे  कोट्यवधी युजर्स आहेत.

यासाठी नव्या बाईट डान्स नव्या अ‍ॅपला भारतामध्ये लाँच करणार आहे.

मात्र तरूणाईला या अ‍ॅपसाठी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *