Sat. Sep 21st, 2019

पुण्यामध्ये होतोय चक्क Tik Tok फिल्म फेस्टिव्हल!

0Shares

Tik Tok या app ने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातलाय. तरुणांमध्ये या app चं विलक्षण वेड आहे. वेगवेगळ्या छापाचे व्हिडिओज करताना आपल्यातील कलाकार जागा करण्याचं कामही या app मुळे झालंय. अनेकांना टिक टॉकवरील व्हिडिओंमुळे प्रसिद्धी मिळालीय, तर अनेकजण प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते व्हिडिओ बनवत असल्याने Tik Tok वादग्रस्तही ठरलं होतं. मात्र Tik Tok चं वेड इतकं वाढलंय की दिल्लीमध्ये टिक टॉक वर प्रसिद्धी कशी मिळवावी याचं प्रशिक्षण देणारे क्लासेस सुरू झाले आहेत. पुण्यामध्येही Tik Tok फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय.

पुण्यामध्ये 20 ऑगस्टपर्यंत हा Tik Tok फिल्म फेस्टिव्हल होणार आहे.

यामध्ये स्पर्धकांनी आपले 3 बेस्ट व्हिडिओज पाठवायचे आहेत.

यामध्ये सोशल अवेअरनेस तसंच, बेस्ट कॉमेडी, बेस्ट इन प्रँक यांसारख्या 12 कॅटेगरी आहेत.

हे व्हिडिओ 5 सेकंदांपासून ते 1 मिनिटापर्यंतचे आहेत.

हिंदी आणि मराठीमधील कलाकारांच्या उपस्थितीत या व्हिडिओंचं प्रदर्शन होणार आहे.

ज्युरी यातील बेस्ट व्हिडिओ निवडतील.

विजेत्यांना 33,333 रूपयांचं पारितोषिकही मिळणार आहे.

दुसरं बक्षिस 22,222 रुपयांचं आहे. तसंच 5,555 आणि 3,333 रुपयांची बक्षिसंही आहेत.

तसंच ट्रॉफी आणि सर्टिफिकेट दिलं जाणार आहे.

हा फिल्म फेस्टिवल Tik Tok तर्फे आयोजित केला गेला नसून एका संस्थेतर्फे आयोजित केलाय. या संदर्भातील पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *