BJPकडून Tik-Tokस्टारला विधानसभेचे तिकीट
मात्र सोनाली ही टिक-टॉक स्टार असल्यामुळे तिचे फॅन देखिल 1 लाखांच्यावर आहे.

Tik Tokमुळे कोणाला विधानसभेचे तिकीट मिळेल असं म्हटंल्यावर तुम्हाला खरं वाटेल का ? मात्र असं खरचं घडलं आहे. हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून भाजपाने चक्क Tik-Tok स्टार सोनाली फोगाटला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने दिवंगत माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा पुत्र कुलदिप बिश्रोई यांच्या विरोधात सोनालीला निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे.
Tik-Tok स्टारला विधानसभेचे तिकीट –
देशात सर्वत्र विधानसभेची चर्चा सुरू असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाली आहेत.
सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत.
भाजपाने हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून Tik-Tok स्टार सोनाली फोगाटला तिकीट दिल्याचे समोर आले आहे.
सोनाली फोगाटच्या विरोधात कुलदिप आदमपूर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले.
मात्र सोनाली ही Tik-Tok स्टार असल्यामुळे तिचे फॅन देखिल 1 लाखांहून अधिक आहे.
राजकारणात उतरण्यापूर्वी ती एक अभिनेत्री सुद्धा होती. मात्र तिला जास्त प्रसिद्धी ही Tik-Tokमुळे मिळाली.
“माझे सगळे फॉलोअर्स मला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी कधी एकदा उमेदवारीचा अर्ज भरते याचीच ती वाट पाहत आहे. माझ्या पक्षाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही नक्कीच विजयी होऊ “, असे ती म्हणाली.
सोनीलीला भाजपाकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर तिने पक्षाचा विजय नक्की होणार या गोष्टीचा विश्वास व्यक्त केला आहे.
या दरम्यान भजनलाल हे तीन वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री असून, त्याच्या कुटुंबाच्या एकाही सदस्याचा या मतदारसंघातून एकादाही पराभव झाला नाही.
आता अशा परिस्थीतीमध्ये सोनालीचा चाहतावर्ग तिला कशा प्रकारे पाठिंबा देणार हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.