Wed. May 12th, 2021

‘मुळशी पॅटर्न’चा थरार आला Tik Tok स्टार्सच्या अंगाशी!

देवाच्या आळंदीत Tik Tok स्टार्सनी नंग्या तलवारी अन कोयते नाचवत ‘मुळशी पॅटर्न’चा थरार रंगवला. मात्र Tik Tok चे त्यांचे दोन व्हिडिओज चांगलेच अंगलट आलेत. याप्रकरणी सहा उतावळ्या Tik Tok स्टार्सना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. आळंदी पोलिसांनी ही कारवाई केली.

‘आम्ही तुम्हाला खाणारच ना!’

‘तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या म्हटल्यावर, आम्ही तुम्हाला खाणारच ना?’ हा या ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमाचा फेमस डायलॉग आहे. त्याचीच अळंदीतल्या Tik Tok स्टार्सनी ‘आळंदी पॅटर्न’ करत साकारली.

आधी आयटी इंडस्ट्रीसाठी जमिनी गेल्या. यातून भाईगिरीचा उदय झाला, हफ्तेखोरी, खंडणी सुरू झाली.

एका भाईला संपवून दुसऱ्या भाईचा उदय झाला अन् नंतर त्याचाही कसा अंत झाला हे ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये आपण पाहिलं.

या सिनेमाचं चित्रीकरण पुण्याच्या मार्केटयार्ड आणि मुळशी भागात झालं.

याच सीनची कॉपी ‘आळंदी पॅटर्न’ साठी केली. त्यासाठी आळंदीमधील बाजारपेठ अन अर्धवट बांधकामांचा आधार घेण्यात आला.

मात्र दिवसा झालेल्या या चित्रीकरणात नंग्या तलवारी अन् कोयते हे नाचवण्यात आल्या. त्यामुळेच हे Tik Tok व्हिडिओ स्टार्स अडचणीत आलेत.

या ‘आळंदी पॅटर्न’मध्ये तीस सेकंदानंतर इंटरव्हलदेखील आहे आणि उर्वरित भाग पंचवीस सेकंदाचा आहे.

या अवघ्या पंचावन्न सेकंदात ‘आळंदी पॅटर्न’ साकारण्यात आलाय.

Tik Tok चे हे दोन भाग परिसरात व्हायरल झाले.

अवघ्या पंचावन्न सेकंदात अख्खा चित्रपटाचा थरार पाहून आळंदी पोलिसांना धक्काच बसला.

पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली, अन् नको त्या करामती करणाऱ्या Tik Tok स्टार्सच्या हे प्रकरण अंगलट आलं.

या 6 स्टार्सना तुरुंगाची हवा खावी लागली. 6 पैकी तिघे आधीच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तेव्हा Tik Tok व्हिडीओ बनवताना काळजी घ्या. अन्यथा तुमचीही वरात थेट तुरुंगात जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *