Fri. May 7th, 2021

TikTok व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात झाडली गोळी आणि…..

शिर्डीतील शिवाजी नगर भागातील हॉटेल पवनधाम येथे एका युवकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. हॉटेलच्या रुम क्रमांक 104 मध्ये हा थरार घडला आहे.या गोळीबारात प्रतिक वाडेकर हा 20 वर्षीय तरुणाचा यात मृत्यू झाला आहे. प्रतिकच्या गळ्यावर बंदुकीची गोळी झाडण्यात आली असून आरोपी नात्यातील असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.

TikTok व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात मृत्यू

प्रतिक वाडेकर त्याचा चुलत भाऊ नितीन वाडेकर यांचेसह पाच जणांनी फ्रेश होण्यासाठी रुम भाड्याने घेतली होती.

प्रतिक वाडेकर राहणार लक्ष्मीनगर शिर्डी हा बाहेरगावी शिक्षणासाठी होता चुलत्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी तो शिर्डीत आला होता.

रुम भाड्याने घेतल्यानंतर पाचजण रुम मध्ये गेले.त्यानंतर रुम मध्ये देशी पिस्तुलातून गोळी झाडत प्रतिकची हत्या करण्यात आली.

घटनेनंतर चौघेही हॉटेलच्या रुम मधुन फरार झाले.हॉटेल मालकाने रुम मध्ये जखमी अवस्थेत बघितल्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहीती दिली.

पोलिसांनी आरोपी सनी पोपट पवार या आरोपीस ताब्यात घेतले असून  अन्य तिघे फरार आहेत.

TikTok व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात गोळी झाडली असल्याचे माहिती समोर आले आहे.

गोळी छातीत घुसल्याने प्रतिकचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना कट्ट्यासह अटक करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *