Fri. May 7th, 2021

TikTok वरच्या ‘या’ मायकल जॅक्सनवर हृतिक, बीग बीही फिदा

TikTok वरचे एकाहून एक भन्नाट क्रिएटिव्ह आणि अतरंगी व्हिडिओ खूपच गाजत असतात.. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच टिकटॉकच्या प्रेमात आहेत. अनेक TikTok स्टार्ससुद्धा यातून नावारूपाला आले आहेत. एका TikTok स्टारची मात्र दखल Bollywood च्या दिग्गजांनाही घ्यावी लागली आहे. या टिकटॉक स्टारची दखल बॉलिवूड अभिनेत्यांनी घेतली आहे. या TikTok स्टारचं नाव आहे ‘बाबा जॅक्सन’

‘बाबा जॅक्सन’ या नावाने TikTok वर हुबेहूब मायकल जॅक्सनसारखा डान्स करणारा मुलगा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नव्या जुन्या हिंदी गाण्यावर मायकल जॅक्सन स्टाईलमध्ये हा मुलगा नाचतो. ते सुद्धा इमारतीच्या गच्चीवर.

या ‘बाबा जॅक्सन’च्या बॉलिवूडचे शहेनशहाँ Big B अमिताभ बच्चन यांनीदेखील दखल घेतली आहे. ‘वाहह!!!!’ असं म्हणत बीग बीं नी त्याचा व्हिडीओ Twitter वर शेअर केला आहे.

तर बॉलिवूडचा बेस्ट डान्सर मानल्या जाणाऱ्या हृतिक रोशननेही या मुलाच्या डान्सची प्रशंसा केली आहे. या मुलाची ‘एअरवॉक’ डान्सस्टाईल सगळ्यात सुंदर आहे, असं म्हणतानाच ‘ही व्यक्ती नक्की कोण आहे?’ असा प्रश्न हृतिक रोशनने विचारला आहे.

‘बाबा जॅक्सन’ चं खरं नाव युवराज सिंग असं असून तो राजस्थानातल्या जोधपूरला राहतो. दिग्दर्शक अभिनव सिन्हा यांनी डान्स कोरिओग्राफर रेमो डिसुझाला ‘देखा क्या’ असं कॅप्शन देत व्हिडीओ टॅग केला होता. हे वाचल्यानंतर रेमोनेदेखील ‘भैय्या, नेक्स्ट फिल्म’ असं उत्तर दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *