Tue. Mar 9th, 2021

न्यूयॉर्कमध्ये टाईम्स स्क्वेअर परिसरात कारने लोकांना चिरडले, एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

 

न्यूयॉर्कमध्ये टाईम्स स्क्वेअर या ऐन गर्दीच्या ठिकाणी भरधाव कार घुसली. या कारने फुटपाथवर चालणाऱ्या लोकांना धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झालेत.

 

टाइम्स स्क्वेअर परिसरात कायमच वर्दळ असते. दरम्यान अपघात झाला त्यावेळी कारचा वेग 120 किमी प्रति तासपेक्षा जास्त होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली.

 

रिचर्ड रोजास असं या आरोपीचं नाव आहे. रिचर्डने ड्रग्जच्या नशेत कार फूटपाथवर चढवली आणि त्यानंतर कार पोलला जाऊन धडकली. अपघातानंतर त्याने रिचर्डने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *