Fri. May 7th, 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेकडे आंदोलन; जलसंधारण मंत्र्यांची घरी सोडले खेकडे

खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे तिवरे धरण फुटल्याचे वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. तानाजी सावंत यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर अनेक टीका करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने खेकडे आंदोलन केले आहे. यामध्ये जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रजमधील घरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी खेकडे सोडले आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

चिपळून येथील तिवरे धरण फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मात्र खेकड्यांमुळे धरण फुटल्याचा आरोप जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केले.

तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने खेकडे आंदोलन केले आहे.

तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तानाजी यांच्या कात्रजमधील घरी खेकडे सोडले असल्याचे समजते आहे.

खेकड्यामुळे धरण फुटले असल्याचे वक्तव्य करणारे मंत्र्यांचे घरही खेकडे फोडतील त्यामुळे पोलिसांनी खेकड्यांना अटक करावी.

तसेच खेकड्यांवर 302चा गुन्हा दाखल करावा असेही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *