Wed. Oct 27th, 2021

नुसरत जहाँच्या मंगळसूत्र, सिंदूरवरून फतवा, नुसरत जहाँ यांचं प्रत्युत्तर!

नवनिर्वाचित तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी हिंदू व्यक्तीशी लग्न केल्याने आणि गळ्यात मंगळसूत्र व कपाळावर सिंदूर लावून संसदेत हजर होत असल्याने यांच्याविरोधात दारुल उलूम देवबंदनं या संघटनेने फतवा जारी केल्याचं वृत्त होतं. या फतव्यावर ‘मला माझा धर्म माहीत आहे. मी जन्मापासूनच मुस्लीम आहे आणि आताही मुस्लीमच आहे,’असे प्रत्युत्तर नुसरत जहाँ यांनी दिल आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर लावून संसदेत हजर होत असल्याने यांच्याविरोधात दारुल उलूम देवबंदनं या संघटनेने फतवा जारी केलाय. मात्र ‘मला माझा धर्म माहीत आहे. मी जन्मापासूनच मुस्लीम आहे आणि आताही मुस्लीमच आहे,’असं प्रत्युत्तर नुसरत जहाँ यांनी दिलं आहे. नुसरतचा पती हिंदू आहे.

नेमकं काय प्रकरण आहे ?

नुसरत जहाँ या तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार आहेत.

यांनी हिंदू व्यक्तीशी लग्न केल्याने आणि गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर सिंदूर लावून संसदेत हजर झाल्या होत्या.

याबाबत नुसरत जहाँ यांच्याविरोधात दारूल उलूम देवबंद या संघटनेने फतवा जारी केला होता.

मात्र या फतव्याला नुसरत जहाँ यांनी प्रत्युत्तर दिलंय.

‘मी निरर्थक गोष्टींकडे लक्ष देत नाही. मला माझा धर्म माहीत आहे. मी जन्मापासूनच मुस्लीम आहे आणि आताही मुस्लीमच आहे. हा विषय श्रद्धेचा आहे. श्रद्धेबाबत किंवा धर्माबाबतचा विश्वास हा तुमच्या मनात असावा लागतो, डोक्यात नाही.’असं उत्तर नुसरत जहाँ यांनी दिलं आहे.

ग्लॅमरस अभिनेत्री-खासदार नुसरत जहाँचा तुर्कस्तानात हिंदू पद्धतीने विवाह!

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या बशीरहाट मतदार संघातून तृणमूल काँग्रेसकडून नुसरत जहाँ निवडून आल्या आहेत.

संसदेत शपथविधीवेळी नुसरत जहाँ या कपाळावर सिंदुर आणि साडी परिधान करून आल्या होत्या.

त्यामुळे दारुल उलूम देवबंदनं या संघटनेद्वारे आक्षेप घेण्यात आला.

त्याचसोबतच नुसरत जहाँ मुस्लिम असल्या कारणाने त्यांनी मुस्लिमेतर व्यक्तीशी लग्न करणं हे इस्लामला मान्य नाही.

त्यामुऴे दारुल उलूमनं नुसरत यांच्याविरोधात फतवा जारी केला आहे.

या फतव्यावर नुसरत जहाँ यांनी या आधी ट्विट करत ‘मी जात, पंथ आणि धर्माच्या पलिकडे सर्वसमावेशक विचाराच्या भारताचं प्रतिनिधित्व करते. मी सर्व धर्मांचा आदर करते. यापुढेही मी मुस्लिमच राहीन आणि इतर कोणालाही मी काय परिधान करावं याची निवड करण्याचा अधिकार नाही. धर्मावरील विश्वास हा तुमच्या वेशावरून ठरत नाही’, असं सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *