Jaimaharashtra news

५० अणुबॉम्ब टाकण्याची पाकची तयारी आहे का ? – मुशर्रफ

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज झाली आहे. तसेच हल्ल्यात शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे भारत बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर कधी हल्ला करू शकते अशी भीती पाकिस्तानला वाटतं आहे. ‘जर पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला तर भारत पाकिस्तानवर २० अणुबॉम्ब टाकून पाकिस्तान उद्ध्वस्त करून टाकेल. पाकिस्तानला उद्ध्वस्त करायचे नसेल तर आम्हला ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील. याची तयारी आहे का’ ? असा प्रश्न माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी उपस्थित केला आहे.

परवेझ मुशर्रफ काय म्हणाले ?

पुलावामा हल्ल्यामुळे सध्या भारत- पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे.

त्यामुळे युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारताने युद्ध पुकारले तर आम्ही सुद्धा युद्ध करू असे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं होतं.

युएईमध्ये आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची बात केली.

जर पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला तर भारत पाकिस्तानवर २० अणिबॉम्ब टाकून पाकिस्तान उद्ध्वस्त करून टाकेल.

पाकिस्तानला उद्ध्वस्त करायचे नसेल तर आम्हला ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील. याची तयारी आहे का ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सध्या परवेझ मुशर्रफ युएईमध्ये राहतात. मात्र भारत- पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावमुळे ते पाकिस्तानात परतणार असल्याचे संकेत दिले आहे.

 

 

 

Exit mobile version