Mon. Nov 30th, 2020

Girlfriend च्या मागण्यांमुळे इंजिनिअर विद्यार्थी बनला दरोडेखोर!

आपल्या Girlfriendच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंग शिक्षण घेणारा विद्यार्थी चक्क दरोडेखोर बनल्याची घटना पुढे आली आहे. मध्य प्रदेशातील रेवा शहरात ही घटना घडली आहे. या विद्यार्थ्याला आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आलंय.

काय होतं नेमकं प्रकरण?

पोलिसांकडे आलेल्या एका तक्रारीच्या आधारावर दरोडेखोरांचा शोध सुरु होता.

पोलिसांनी सायबर सेलची मदत घेऊन आरोपी सुजीत पांडे याला अटक केली.

त्याची चौकशी केल्यावर गेल्या अनेक दिवसांपासून शहरात होणाऱ्या दरोड्यांचा उलगडा झाला.

सुजीत हा कुणी अट्टल चोर वा दरोडेखोर नसून तो चक्क इंजिनियरिंगचा विद्यार्थी होता.

त्याचं दरोडे करण्यामागचं कारण म्हणजे आपल्या Girlfriendला खूश करणं हे होतं.

गर्लफ्रेंडच्या वेगवेगळ्या खर्चिक मागण्या पूर्ण करता याव्या यासाठी त्याने चक्क मित्रांच्या सहाय्याने दरोडे घालायला सुरुवात केली.

आरोपींकडे मोबाइल, मोटरसायकल आणि इतर गोष्टी आढळून आल्या. आपण दोन ठिकाणी दरोडा घातल्याची कबुलीही त्याने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *