Tue. Jul 27th, 2021

समलैंगिक नसल्याचे दाखवण्यासाठी फिलिपिन्सच्या अध्यक्षाचा ‘हा’ अजब प्रकार

जपानच्या दौऱ्यावर असताना फिलिपिन्सच्या अध्यक्षांनी चक्क स्टेजवर एकाचवेळी पाच महिलांचे चुंबन घेतले आहे.फिलिपिन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुर्तेते यांनी पाच महिलांना स्टेजवर बोलावून हा प्रकार केल्याचे समजते आहे. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटीझन्स मोठ्या प्रमाणात ट्रोलही करत आहे.

नेमक काय घडलं ?

जपानच्या दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात फिलिपिन्सच्या अध्यक्ष उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी फिलिपिन्सचे अध्यक्ष यांना स्टेजवर बोलवण्यात आले होते.

स्टेजवर उभे असताना रोड्रिगो यांनी पाच महिलांना स्टेजवर बोलवण्यात आले.

यावेळी एकाचवेळी मंचावर बोलावून पाच महिलांना चुंबन केले.

फिलिपिन्सच्या सरकारमधील एका नेत्याने रोड्रिगो यांना समलैंगिक असल्याची टीका केली होती.

याच टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी रोड्रिगो यांनी महिलांचे चुंबन घेतल्याचे म्हटलं आहे.

तसेच या सुंदर महिलांमुळेच मी समलैंगिक होण्यापासून बचावलो असल्याचे म्हटलं आहे.

चुंबन घेताना एक महिला प्रचंड भावूक झाली असून तिच्या डोळ्यातून अश्रू आल्याचे दिसले.

तसेच इतर महिलांनी रोड्रिगो यांचे आभारही मानले.

मात्र त्यांच्या या कृतीमुळे रोड्रिगो सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *