Jaimaharashtra news

राजर्षी शाहू महाराज यांची आज १४७ वी जयंती

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांची आज १४७ वी जयंती आहे . या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक दसरा चौक इथल्या पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने जयंतीचे सर्व कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावतीने शाहू जन्मस्थळ इथे अभिवादन करण्यात येणार आहे.

शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८८४ साली घाटगे घरण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत. कोल्हापूरचे संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ साली यशवंतरावांना दत्तक घेतलं. त्यानंतर त्यांचे ‘शाहू’ असे नामकरण करण्यात आले. अवघ्या २० व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर तब्बल २८ वर्ष कोल्हापूर संस्थानाचे ते राजे होते. ‘छत्रपती शाहू महाराज’, ‘राजर्षी शाहू महाराज’, ‘कोल्हापूरचे शाहू’, ‘चौथे शाहू’ अशा अनेक नावांनी त्यांना ओळखले जाते. आज त्यांची जयंती. त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी जयंती निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांना मानवंदना दिली जाते. त्यांनी समता, बंधूतेचा संदेश दिला. दलितांवरील अन्याय दूर करण्यासाठी ते अखंड झटले.

Exit mobile version