Sat. May 25th, 2019

आज भारतात लाँच होणार सॅमसंगचा 5 कॅमेरे असलेला नवा स्मार्टफोन

0Shares

तुम्ही नव्या स्मार्टफोनच्या शोधात आहात तर मग ही बातमी फक्त तुमच्यासाठीच. सॅमसंग कंपनीने तुमच्यासाठी एक मस्त आणि झकास स्मार्टफोन आणला आहे. सॅमसंग आज जगातील पहिला रिअर क्वॉड कॅमेरा स्मार्टफोन लाँच करणार आहे. 20 नोव्हेंबरला Samsung Galaxy A-9 हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. या फोनची खासियत म्हणजे यामध्ये 4 कॅमेरे असणार आहेत. सॅमसंगने याआधी 3 कॅमेरा असलेला Samsung Galaxy A-7 हा सर्वात महाग फोन मार्केटमध्ये आणला होता. सॅमसंगचा हा नवा स्मार्टफोन काळ्या, निळ्या आणि गुलाबी अशा 3 रंगामध्ये Galaxy A-9 असेल अशी शक्यता आहे. 4 कॅमेरे असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 35 हजारांच्या आसपास असेल.

Samsung Galaxy A-9 चे फीचर

  • LED डिसप्ले 6.3 इंचचा आहे.
  • या फोनमध्ये सुपर फास्ट चार्जिंग असून 3,800 अॅम्पियर इतकी बॅटरी आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 6GB, 8GB अशी RAM आणि 128GB इंटरनल मेमरी असणार आहे.
  • फोनची मेमरी वाढवायची असेल तर मेमरी कार्डचा वापर करू शकता. 384GB पर्यंत मेमरी कार्ड टाकू शकता.
  • या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. त्याचबरोबर याफोनमध्ये फेस लॉक हा पर्यायदेखील असणार आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 24 Megapixel चा सेल्फी कॅमेरा असेल ज्यात Depth effect म्हणजेच फोकस करण्यासाठी 5 Megapixel आणि 8 Megapixel चा Ultra wide angle cencor असेल.
  • या स्मार्ट फोनमधील चौथा कॅमेरा 10 Megapixel चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *