Sat. Nov 27th, 2021

महाशिवरात्री : राज्यात महादेवाच्या प्राचीन मंदिरांत उत्साह

आज सर्वत्र महाशिवरात्री उत्साहात साजरी होत असून देशभरात महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी आहेत.

राज्यातच नव्हे तर देशभरातील भक्त मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर दुधाचा, फुलांचा अभिषेक करत आहेत.

भाविकांनी आज पहाटेपासूनच महादेवाच्या मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

मुंबईतील बुलेश्वर, वाळकेश्वर, अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, पुण्यातील ओंकारेश्वर, साताऱ्यातील बुलेश्वर, परळीतील ओंढा नागनाथ सारख्या अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांनी उपस्थिती आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशभर शंकराच्या मंदिरांमध्ये विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे

महाशिवरात्रीनिमित्त राज्यात प्राचीन मंदिरांत उत्साह

मुंबई  -नर्मदेश्वर

मुंबईत नर्मदेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी होत असून मंदिरात दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे. 300 वर्षपूर्वीच जागृत मंदिर म्हणून  याची ख्याती आहे.

तसेच महारूद्र अभिषेक, होमहवन, महाप्रसाद, भजन, किर्तन, प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

शिव भक्तांनी शिवदर्शनासाठी मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत.

पुणे – ओकारेश्वर

पुण्यातील ओकारेश्वर मंदिर हे सुमारे २८५ वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे.

पहाटे चार वाजता अभिषेक करुन भाविकांसाठी दर्शन रांग खुली करण्यात आली आहे. दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ओकारेश्वर मंदिराची रचना ही विशेष प्रकारची असून हिंदू मंदिरात अशी रचना कोठेही आढळून येत नाही.

भव्य प्रवेशद्वार, देवडी, नंदीमंडप, आवार, प्रदक्षिणा मार्ग, गर्भगृह म्हणजेच जिथे मुख्य शिवलिंग आहे. तोच गाभारा अशी मंदिराची रचना आहे.

नाशिक – त्र्यंबकेश्वर

बारा जोतिर्लिंग पैकी महत्वचा मंदिर म्हणून ओळखले असलेल्या नाशिकच्या त्रयंबकेश्वर मध्ये आज महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात संपन्न होत आहे.

आज पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली असून महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी  दाखल झाले आहेत.

आज पहाटे शिवपिंडीला पंचामृतांनी स्नान घालून भस्म आणि बेलाचे पान वाहत अभिषेक करून महापूजा संपन्न झाली.

नागपूर – कल्यानेश्वर

नागपूरच्या प्रसिद्ध कल्यानेश्वर शिव मंदिरात सकाळपासून भक्तांनी गर्दी केली होती.

हे प्राचीन भोसलेकालीन शिव मंदीर असून महाल स्थित राजवाड्याच्या पूर्व दारावर हे प्राचीन मंदिर आहे.

हिंगोली – औंढा नागनाथ

हिंगोलीमध्ये देशातील १२  ज्योतिर्लिंगापैकी ८ वे  ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त काल रात्री 2 वाजतापासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.

रात्री 2 वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांना दर्शनासाठी मंदिर उघडण्यात आले.

पांडव  काळातील हे शिवलिंग असून ते स्वयंभू आहे.

बीड – परळी वैद्यनाथ

बीड जिल्ह्यातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथ येथे रात्रीच्या बारा वाजता पूजा झाली.

यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी मोठीं गर्दी केली आहे.

मंदिर परिसराला आकर्षक अशी विद्यत रोषणाई करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग – कुणकेश्वर

दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या श्री.क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्र उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे.

रात्री 12 वाजता गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते अभिषेक केल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली.

कुणकेश्वर नगरीत लाखो भाविकांसह चाकरमानी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *