Sat. May 25th, 2019

जागतिक मुद्रण दिन : जर्मनीमधून अशी आली भारतात मुद्रणकला!

24Shares

तेजस्विनी काटवटे, वेब जर्नलिस्ट

 

सध्याचं युग हे माहितीचे युग म्हणून ओळखलं जातं. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये अफलातून बदल झालं.  त्यातच छपाई तंत्रज्ञानामध्येही बदल झाले  आहेत.

छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळे लिखित कल्पना विचार लोकांपर्यंत पोहचवणं शक्य झालं.

24 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभरात साजरा होतो.

याचं कारण म्हणजे 24 फेब्रुवारी हा मुद्रण कलेचे जनक जोहान गुटेनबर्ग यांचा जन्मदिन आहे.

कोण होते जोहान गुटेनबर्ग ?

जर्मनीतील मेंझ येथील जोहान गुटेनबर्ग यांनी इ.स.1450 मध्ये अक्षरांचे सुटे खिळे बनवण्याचा शोध लावला.

त्यामुळे जोहान गुटेनबर्ग यांना मुद्रण कलेचा जनक मानले जाते.

टाईपबरोबरच छपाई यंत्राचा शोधही गुटेनबर्ग यांनी लावला.

गुटेनबर्ग यांचा चांदीच्या कारागिरीचा  मूळ व्यवसाय होता.

सुरूवातीला त्यांनी भागीदारीमध्ये मुद्रणाचा,छपाईचा व्यवसाय सुरू केला.

त्यांनी इ.स.1434-39 या काळात स्ट्रासबर्गला मुद्रणाचा उपयोग केला.

यामध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या.

या मुद्रणामध्ये अक्षर वाकडे दिसत होते.

मोठ्या प्रमाणावर मुद्रण करण्यासाठी गुटनबर्गने एक वेगळ्या प्रकारचं  यंत्र तयार केलं.

या यंत्राच्या आधारे गुटनवर्गने पहिल्यांदा बायबल ग्रंथाची छपाई केली.

बायबल हे पहिले मुद्रित पुस्तक मानलं जातं आणि या जगातल्या सर्वात पहिल्या मुद्रणाचं श्रेय जातं ते जोहान गुटेनबर्ग यांनाच.

चीनमध्ये होत असे पूर्वीपासून मुद्रण

गुटनबर्गच्या कितीतरी आधी चीनमधील लोकांना खरंतर मुद्रणकला अवगत होती.

दुसऱ्या शतकाच्या शेवटी चिनी लोकांनी मजकूर मुद्रित करण्याची पद्धत शोधली.

कारण मुद्रणासाठी आवश्यक असणारे कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा या गोष्टी चीनमध्ये उपलब्ध होत्या.

पण हे मद्रण गुटनबर्गने शोधून काढलेल्या मुद्रणयंत्रापेक्षा वेगळं होतं.

असं होतं चायनिज प्रिंटिंग

कोरलेल्या मजकुरावर शाई लावली जाई.

त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा उमटवित होते.

त्यामध्ये धार्मिक स्वरूपाचा मजकूर असायचा.

 

भारतातील मुद्रणकला

भारतामध्ये मुद्रणकला 1556 साली आली

पोर्तुगाल मधून जहाजावरून छपाईयंत्र प्रथम गोव्यात आला.

भारतीयांना धर्मांतरासाठी उद्युक्त करण्यासाठी, धर्मप्रसार करण्यासाठी बायबलच्या प्रती छापण्याकरिता हे छपाईयंत्र भारतात आणलं.

तंत्राचा प्रसार गोव्यातून भारताच्या इतर भागांमध्ये झाला.

कोचीन, पुडीकाईल, अंबलकडू त्रांकेबार यासारख्या किनारी प्रदेशात छापखाने सुरू झाले.

1557 मध्ये या मुद्रणालयातून ‘जे बुस्तामा ते’ यांनी सेंट झेव्हिअर यांचं Dortrina Christa हे पहिलं पुस्तक छापलं.

1778 हे वर्ष मुद्रण व्यवसायात ऐतिहासिक ठरलं.

यावर्षी ग्रामर द बेंगाली लँग्वेज हे पुस्तक कलकत्याजवळील हुगळी येथील अडूज यांच्या छापखान्यात छापले.

महाराष्ट्रातील मुद्रणकला

महाराष्ट्रामध्ये 1882 मध्ये मुद्रणास सुरुवात झाली. यावर्षी अमेरिकन मिशनने मुंबई येथे मुद्रणालय सुरू केले.

श्रीरामपूर येथून देवनागरी लिपीचे काही खिळेही आणले.

1917 साली महाराष्ट्रात छापलेलं एक पुस्तक उपलब्ध आहे.

या मुद्रणालयात नोकरीस असलेले टॉमस ग्रहम हे मातृका तयार करण्यास शिकले.

टॉमस ग्रहम देवनागरी आणि गुजराती लिन्यांचे साचे बनवून त्यांच्या मातृका तयार केल्या.

अमेरिकन मिशनचे गणपत कृष्णाजी पाटील हे ग्रहम यांच्याकडून मातृका करण्यास शिकले.

1827 मध्ये त्यांनी स्वतःचे मुद्रणालय सुरू केले. पाटील यांनी चुनखडकावरून समपृष्ठ छपाई केली.

त्यांनी यंत्र तयार करून पंचांगाची छपाई केली.तसेच त्यांनी अक्षर मुद्रणालयही सुरू केले.

1931 च्या अखेरीस मोनोटाइप यंत्रावर देवनागरी लिपीची जुळणी शक्य झाली.

मुद्रणकलेत झालेले बदल

1.ब्लॉक प्रिंटिंग
2.स्टेंसिल
3.हलविता येणारे टाईप
4.रोटरी प्रिंटिंग
5.लिथो प्रिंटिंग
6.रंगीत प्रिंटिंग
7.ऑफसेट प्रिंटिंग
8.स्क्रिन प्रिंटिंग
9.फ्लेक्सओग्राफी
10.फोटोकॉपीयर
11.लेझर मुद्रण
12.डॉट मॅट्रिक्स प्रिंटिंग
13.डिझिटल प्रेस

सध्या कंम्प्युटरायझेशन झाल्यामुळे मुद्रणकलेत बदल होत आहेत आणि मुद्रण अतिशय सोपे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *