Wed. Jun 19th, 2019

पायपुसण्यांवर हिंदू देवतांचे फोटो, ‘अमेझॉन’विरोधात हिंंदू धर्मीय आक्रमक!

0Shares

देशातील मोठी E-Commerce कंपनी ‘अमेझॉन’कडून विकल्या जाणाऱ्या काही वस्तूंमधून हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्याबद्दल अमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन सोशल मीडियावर होऊ लागलंय. सोशल मीडियावर #BoycottAmazon हा हॅशटॅग सुरू झाला आहे.

पायपुसण्यांवर देवतांचे फोटो!

हिंदू देवतांचे फोटो छापलेली पायपुसणी आणि शौचालयांवरील कापड अमेझॉनवर विकायला ठेवलं आहे.

या टॉयलेट कव्हर्सवर चक्क भगवान शंकर, गणपती बाप्पा तसंच हनुमानाचे फोटो छापण्यात आले आहेत.

यामुळे अर्थातच हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

सोशल मीडियावर त्यांनी या गोष्टीवर आक्षेप नोंदवताना अमेझॉनवरच बहिष्कार घालण्याची मोहिम सुरू केली आहे.

अनेकांनी तर अमेझॉन अनइन्स्टॉल करून त्याचे स्क्रीनशॉट्सही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यापूर्वीही अमेझॉनवर अशा प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीवरून वाद झाला आहे.

हिंदू देवीदेवतांप्रमाणेच भारतीय राष्ट्रध्वज असणारा तिरंगा छापलेली पायपुसणीही विक्रीस ठेवली होती.

त्यावेळीही भारतीयांनी मोट्या प्रमाणावर अमेझॉनवर टीका केली होती.

तसंच महात्मा गांधींचे फोटो असणाऱ्या चपलादेखील अमेझॉनने विक्रीसाठी ठेवल्या होत्या. तेव्हादेखील सोशल मीडियावर भारतीयांनी अमेझॉनवर बहिष्कार टाकला होता. मात्र त्यानंतर या वस्तू आपल्या वेबसाईटवरून काढून टाकल्या होत्या. आतादेखील अमेझॉनने या वस्तूंची विक्री करू नये, यासाठी हिंदू धर्मियांनी ऑनलाईन आंदोलनच सुरू केलं आहे. त्यामुळे या वस्तूदेखील अमेझॉनला आपल्या वेबसाईटवरून काढून टाकाव्या लागणार आहेत.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: